लखीमपूर हिंसा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत, गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – शरद पवार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी केंद्र आणि उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.पवार म्हणाले की, लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मुलगा घटनास्थळी उपस्थित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.Lakhimpur violence: Uttar Pradesh Chief Minister cannot run away from responsibility, Home Minister should resign – Sharad Pawar

पुढे पवार केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अटक करण्यात आली आहे.सत्ताधारी पक्षाने भूमिका घ्यावी. यूपीचे मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री या प्रकरणात जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत.दरम्यान राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.लखीमपूर हिंसाचारावर शरद पवारांनी काही विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी लखीमपूर खेरी हिंसाचाराची तुलना ब्रिटिश राजवटीतील जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. जनतेने भाजपला त्याची जागा दाखवावी, असेही पवार म्हणाले होते.

भाजपने शेतकरी विरोधी आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप पवारांनी केला होता.तसेच शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

Lakhimpur violence: Uttar Pradesh Chief Minister cannot run away from responsibility, Home Minister should resign – Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या