लखीमपूर हिंसाचाराबाबत राष्ट्रपतींकडे काँग्रेस शिष्टमंडळाच्या “या” दोन मागण्या


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचाराची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींनी करावी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावे, अशा मागण्या घेऊन काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटले. काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. Two demands of the Congress delegation to the President regarding the Lakhimpur violence

लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा देशाच्या राजकीय पटलावर लावून धरणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांच्या समवेत होते. लखीमपूर हिंसाचाराबाबत आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष जे पाहिले ते सर्व तथ्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापुढे मांडले. आणि त्यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत. पहिली म्हणजे लखीमपुर हिंसाचाराची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायमूर्तींनी करावी आणि ही चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांना बडतर्फ करावे त्या मागण्या आम्ही राष्ट्रपतींकडे केल्या आहेत, अशी माहिती राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांना दिली.

या मुद्द्यावर केंद्र सरकार बरोबर आजच चर्चा करून त्यांना निर्णय घेण्यास सांगण्याचे आश्वासन राष्ट्रपतींनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती प्रियांका गांधी यांनी दिली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांबरोबर आंदोलनात उभी राहील, अशी ग्वाही प्रियांका गांधी यांनी दिली.

Two demands of the Congress delegation to the President regarding the Lakhimpur violence

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात