Lakhimpur Kheri incident petition filed in Supreme Court : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले आहे. 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी गृह मंत्रालय आणि पोलिसांना निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. Lakhimpur Kheri incident petition filed in Supreme Court seeking direction to register FIR
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले आहे. 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी गृह मंत्रालय आणि पोलिसांना निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
दोन वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, त्यात सीबीआयचाही सहभाग असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
The plea filed by two lawyers also seeks setting up of high-level judicial inquiry under the supervision of the Supreme Court involving CBI in stipulated time. — ANI (@ANI) October 5, 2021
The plea filed by two lawyers also seeks setting up of high-level judicial inquiry under the supervision of the Supreme Court involving CBI in stipulated time.
— ANI (@ANI) October 5, 2021
लखीमपूर खीरीचे दोन वेळचे खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या (टेनी) मूळ गावात बनबीरपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यानंतर उसळलेल्या हिंसेत आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, मिश्रा यांचा मुलगा ज्या एसयूव्हीमध्ये बसला होता, त्याच वाहनाने शेतकऱ्यांना चिरडले आणि त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, मिश्रा यांनी हा आरोप फेटाळला आहे. नंतर जमावाच्या हल्ल्यात इतर चार जण ठार झाले.
या घटनेवरून राजकारण तापले आहे. विरोधक सातत्याने भाजप सरकारला दोष देत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, दीपेंद्र हुड्डा, कुलदीप वत्स आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासह 10 नेत्यांवर फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीतापूरचे उपजिल्हाधिकारी प्यारे लाल मौर्य यांनी मंगळवारी येथे सांगितले की, 4 ऑक्टोबर रोजी सीआरपीसीचे कलम 151, 107 आणि 116 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ते म्हणाले, ‘हे प्रतिबंधात्मक कलम आहेत, एकदा आम्हाला आश्वासन मिळाले की त्यांच्याकडून शांतता भंग होणार नाही की ते काढून टाकले जातील. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी अजूनही आहेत पोलीस कोठडीत आहेत. प्रियांका गांधी आपल्या सहकारी नेत्यांसह सोमवारी पहाटे मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी लखीमपूर खीरीला रवाना झाल्या होत्या, पण वाटेत त्यांना सीतापूर येथे ताब्यात घेण्यात आले.
Lakhimpur Kheri incident petition filed in Supreme Court seeking direction to register FIR
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App