विशेष प्रतिनिधी
लखनौ – लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिकुनिया गावात पाच राज्यांतील पन्नास हजार शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी नेत्यांकडून काही महत्त्वपूर्ण घोषणा करतानाच आंदोलनाच्या भावी वाटचालीची दिशा निश्चि्त करण्यात आली.Lacks of people presented for condolence meet lakhimpur
विशेष म्हणजे प्रियांका यांना यावेळी व्यासपीठावर स्थान मिळू शकले नाही. त्यांनीही लोकांमध्ये बसणे पसंत केले. आज अनेक राजकीय नेते सामूहिक प्रार्थनेला उपस्थित होते. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी देखील हेही यावेळी उपस्थित होते, चौधरी यांनाही व्यासपीठावर जागा मिळाली नाही. कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर स्थान द्यायचे नाही असा निर्धारच शेतकरी नेत्यांनी केला होता.
शेतकऱ्यांनी घेतलेले काही निर्णय असे – पंतप्रधानांच्या पुतळ्याचे १५ ऑक्टोबर रोजी दहन करण्यात येणार, देशभर १८ ऑक्टोबर रोजी रेल रोको आंदोलन होणार, लखनौत २६ रोजी भव्य किसान महापंचायत होणार .
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App