त्याच्या या दौऱ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये एका अशा व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, जो पीएमओ अधिकारी असल्याचे सांगून केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करत होता. किरण पटेल असे या ठगाचे नाव असून तो गुजरातचा रहिवासी आहे. त्याला ३ मार्च २०२३ रोजी श्रीनगरमधून अटक करण्यात आली होती. पण ही माहिती आता प्रसारमाध्यमांसमोर आली आहे. विशेष म्हणजे त्याचे व्हिरेफाइड ट्वीटर अकाउंट असून हजारो फॉलोअर्सदेखील आहेत. Kiran Patel a fraudster who traveled Jammu and Kashmir claiming to be a PMO official was arrested
गुरुवारी (१६ मार्च २०२३) जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याला श्रीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. किरण पटेल ऑक्टोबर २०२२ पासून काश्मीर खोऱ्याला भेट देत होता. अटक होण्यापूर्वी तो नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) उरी कमांड पोस्ट मार्गे श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचला होता. एवढच नाही तर तो जम्मू-काश्मीरमधील पंचतारांकित हॉटेलमध्येही राहायचा आणि झेड प्लस सुरक्षा असलेल्या बुलेटप्रूफ वाहनात फिरायचा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरण पटेल स्वतःची पंतप्रधान कार्यालयातील अतिरिक्त संचालक (रणनीती आणि मोहीम) म्हणून ओळख सांगायचा. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी जम्मू-काश्मीरलाही भेट दिली होती. त्याच्या या भेटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पोलीस आणि निमलष्करी दलांच्या संरक्षणात तो काश्मीरमध्ये विविध ठिकाणी दिसून येतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तो बडगाममधील दूधपथरी येथे बर्फावर चालताना दिसत आहे. याशिवाय तो श्रीनगर क्लॉक टॉवर आणि उरीमध्ये एलओसीजवळ सुरक्षा दलांसोबत पोज देतानाही दिसतो.
राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द होणार? भाजपचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, विशेष समिती स्थापन करण्याची मागणी
किरण पटेल याने उच्चस्तरीय सरकारी सुविधांचा लाभ घेत, जम्मू-काश्मीरच्या विविध भागांचा केवळ दौराच केला नाही, तर बडगाममध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्याचे कळते. संशय आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना त्याच्याबद्दल अलर्ट केले. त्यानंतर त्याला श्रीनगरमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली.
श्रीनगरमधील निशात पोलिस ठाण्यात पटेल विरुद्ध आयपीसी कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या ठगाचा वेळीच शोध न लागल्याने जम्मू-काश्मीर पोलीस विभगाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. गुजरात पोलिसांचे पथकही तपासात गुंतल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App