तालिबान्यांपासून माझ्या मुलीला वाचवा, अफगाणिस्तानात अडकलेल्या केरळमधील आईची सरकारला आर्त विनवणी, मुलीने इसिससाठी सोडला होता देश

Kerala Women Who Joined ISIS Stuck In Afghanistan, Mother Pleading To Get Her Back To India

Kerala Women : इसिसमध्ये सामील होण्यासाठी केरळमधून पळून गेलेली एक महिला अफगाणिस्तानात अडकली आहे. महिलेच्या आईने तिला परत आणण्यासाठी आणि तिच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला चालवण्यासाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे. Kerala Women Who Joined ISIS Stuck In Afghanistan, Mother Pleading To Get Her Back To India


वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : इसिसमध्ये सामील होण्यासाठी केरळमधून पळून गेलेली एक महिला अफगाणिस्तानात अडकली आहे. महिलेच्या आईने तिला परत आणण्यासाठी आणि तिच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला चालवण्यासाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे.

निमिषा फातिमा नावाची ही महिला 2017 मध्ये केरळमधून बेपत्ता झाली होती. नंतर अशी बातमी आली की, दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील झाल्यानंतर तिने 2019 मध्ये अफगाण सैन्याकडे आत्मसमर्पण केले होते.

अफगाणिस्तानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर आणि शेकडो कैद्यांची तुरुंगातून सुटका केल्यानंतर निमिषाच्या आई बिंदू संपत यांनी सरकारकडे हे आवाहन केले आहे. निमिषा फातिमा काबूलच्या तुरुंगात शिक्षा भोगत होती. कैद्यांची सुटका केल्यानंतर ती कुठे गेली याची कोणतीही माहिती कळलेली नाही.

पुन्हा तालिबान्यांच्या हातात पडण्याची भीती

निमिषाला पाच वर्षांची मुलगीही आहे. बिंदू संपत म्हणाल्या की, त्यांना आपली मुलगी तालिबानच्या हाती पडेल पुन्हा पडण्याची भीती आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्या म्हणाल्या की, “कैद्यांची सुटका झाल्याची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. त्यानंतर संध्याकाळपर्यंत बातम्या आल्या की त्यांना सोडण्यात आले नाही.”

भारताच्या कायद्यानुसार निमिषाला शिक्षा व्हावी

त्या म्हणाल्या की, “जर निमिषाने माझ्या देशासोबत द्रोह केला असेल तर तिला इथल्या कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. मी चार वर्षांपासून हेच ​​सांगत आहे. जर तिला अफगाणिस्तानातून भारतात आणले तर मी तिची काळजी घेईन. माझ्या नातेची काळजी घेईन. अन्यथा तीसुद्धा दहशतवाद्यांच्या तावडीत सापडेल. भारत सरकारला तिला परत आणण्याचा परवानगी का देत नाहीये, मला कळत नाही.

दहशतवाद्यांनी निमिषाचे ब्रेनवॉश केले होते

त्या म्हणाल्या की, “तिरुअनंतपुरम येथील निमिषाच्या कोचिंग सेंटरमध्ये एक डॉक्टर आणि दहशतवाद्यांनी तिला आयएसआयएसमध्ये सामील होण्यास भाग पाडले. 2017 मध्ये केरळमधून 17 जण बेपत्ता झाले, त्यांचा मास्टरमाईंड अब्दुर रशीद आणि इतर चार जण होते.”

निमिषा आणि तिची चार वर्षांची मुलगी अफगाणिस्तानमध्ये तुरुंगात आहेत, कारण ती आणि आयएसआयएसशी संबंधित 400 जणांनी अफगाण सैन्याला आत्मसमर्पण केले. निमिषा फातिमाचा पती अमेरिकेच्या आयएसआयएस तळावर झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला होता.

Kerala Women Who Joined ISIS Stuck In Afghanistan, Mother Pleading To Get Her Back To India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात