Inside Story of Harish Bangera :CAA-NRC समर्थन केल्याचा राग अन् हरिश बंगेराच फेक अकाउंट ; ६०४ दिवस सौदी तुरूंगात;कर्नाटक पोलीस-परराष्ट्र मंत्रालयामुळे वतन वापसी


  • CAA च समर्थन केल्याने कर्नाटक मधील दोन मुस्लिम तरूणांनी बनवले हरिशचे फेक अकाउंट .

  • न केलेल्या फेसबुक पोस्टसाठी एक भारतीय ६०४ दिवस सौदी तुरुंगात राहिला.

  • कर्नाटक पोलीसांनी जबरदस्त कामगीरी करत हरिश बंगेरांला भारतात परत आनले …

विशेष प्रतिनिधी

उडुपी: एका भारतीय तरुणाने न केलेल्या फेसबुक पोस्टसाठी ६०४ दिवस सौदी तुरुंगात घालवावे लागले. मायदेशी परतल्यावर त्यांनी घडलेली घटना सांगितली.हरिश बंगेरा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एक वातानुकूलन तंत्रज्ञ आहेत .ते सौदी मध्ये कामानिमीत्त वास्तव्यास आहेत .त्यांनी CAA चं समर्थन करणारी पोस्ट केली .याच गोष्टीवरून दोन मुस्लिम तरूणांनी बनवले हरिशचे फेक अकाउंट आणि फेक पोस्ट करत ‘क्राउन प्रिन्स आणि एका समुदाया बद्दल बदनामी कारक पोस्ट केली .त्यामूळे सोशल मीडीयावर बदनाम केल्याच्या आरोपावरून त्यांना सौदी अरेबियाच्या तुरुंगात ६०४ दिवस घालवावे लागले.Inside Story of Harish Bangera: Anger over CAA-NRC support and Harish Bangera’s fake account; 604 days in Saudi jail; repatriation due to Karnataka Police-Ministry of External Affairs

३४ वर्षीय हरीश बंगेराला सौदीत तुरुंगात जावे लागले.उडुपी पोलिसांच्या चौकशीनंतर त्यांना तुरुंगात टाकलेल्या प्रकरणामागचे खरे कारण कळाले. भारतीय पोलिसांच्या मदतीने हरीश बंगेरा यांची सुटका झाली आणि ते मायदेशी परतले.Inside Story of Harish Bangera: Anger over CAA-NRC support and Harish Bangera’s fake account; 604 days in Saudi jail; repatriation due to Karnataka Police-Ministry of External Affairs

काय झालं नक्की?

बिजाडी गावातील रहिवासी असलेल्या बंगेराला २२ डिसेंबर २०१९ रोजी सौदी शहर दम्मममध्ये अटक केली जिथे ते काम करत होते. भारत सरकारच्या नागरिकत्व (सुधारणा) कायद्याला पाठिंबा देणारी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची योजना बनवणारे फेसबुक पोस्ट केल्याने त्यांच्यावर दोन मुस्लिम तरूणांनी डाव धरला.त्यांच्या नावे फेक पोस्ट केल्या बदनामी कारक मजकूर टाकला .
फेक फेसबुक अकाऊंट काढणार्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि एका समुदायाविरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्या, ज्यामुळे त्याला अटक झाली.

अशी झाली सुटका

उडुपी येथे घरी परतल्यावर त्यांची पत्नी सुमन एम यांनी जिल्हा पोलिसांकडे तक्रार दाखल केली, की अज्ञात व्यक्तींनी फेसबुकवर बंगेराचे अकाउंट बनवले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, स्थानिक पोलिसांनी दक्षिण कानंदा जिल्ह्यातील मूडबिद्री शहरातून अब्दुल हुयेझ आणि अब्दुल थुएझ या दोन भावांना अटक केली होती, जेव्हा त्यांच्या तपासामध्ये असे आढळून आले की दोघांनी त्याच दिवशी बंगेराच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार केले कारण बंगेराने आधिच त्याची प्रोफाईल निष्क्रिय केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगेरा यांनी सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केल्याने त्यांनी रागातून हे केले.

उडुपी जिल्हा पोलिसांनी १० दिवसांच्या आत आरोपपत्र सादर केले. एसपी, उडुपी, एन विष्णुवर्धन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की आरोपपत्राचे भाषांतर आणि सौदी अधिकाऱ्यांसोबत MEA द्वारे सामायिक केले आहे. मंगळवारी सौदी अधिकाऱ्यांनी बंगेराची सुटका केली.बेंगळुरू विमानतळावर बुधवारी, बंगेरा १९ महिन्यांनंतर आपल्या चार वर्षांच्या मुलीला पाहून आपले अश्रू आवरू शकले नाहीत.

“मला दुसर्‍या कोणीतरी केलेल्या पोस्टमुळे दहशतवादी ठरवले गेले. मी आणि माझे कुटुंब भयानक काळातून गेलो. ”त्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. “मला तुरुंगात टाकण्यापूर्वी मी दिवसातून तीन-चार वेळा माझ्या पत्नी आणि मुलीला व्हिडीओ कॉल करायचो. मला तुरुंगात टाकल्यानंतर मी त्यांच्याशी क्वचितच बोललो.”

आपल्याला न्याय मिळेल याची त्याला नेहमीच खात्री होती “पण तुरुंगात ६०४ दिवस घालवल्यानंतरच माझी सुटका झाली.”

कर्नाटक पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयाची साथ मिळाली त्यामूळे हरिश बंगेरा परतले .

Inside Story of Harish Bangera: Anger over CAA-NRC support and Harish Bangera’s fake account; 604 days in Saudi jail; repatriation due to Karnataka Police-Ministry of External Affairs

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात