वृत्तसंस्था
कोट्टायम : केरळमध्ये शनिवारपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत दक्षिण आणि मध्य भागामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला, तर कोट्टायम आणि इडुक्कीत भूस्खलनानंतर २२ जण बेपत्ता झाले आहेत. Kerala Flood, Heavy Rain and flood in kerala Kottayam, Pathanamthitta And Idukki, Relief Operations under going
राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. पूर परिस्थिती पाहता सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
मुसळधार पावसामुळे केरळच्या इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. हवामान विभागाने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्रावणकोर देवासम मंडळाने भगवान अयप्पाच्या भक्तांना १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी सबरीमाला मंदिरात न जाण्याचे आवाहन केलं आहे. तिकडे राज्यातील पंबा नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी रात्री तातडीची बैठकघेतली ते म्हणाले की लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली आहे. जिल्ह्यांमध्ये मदतकार्य सुरू केले आहे. सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की हे तीन जिल्हे मुसळधार पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
भारतीय हवामान विभागाने पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. कोट्टायम आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App