कितना चंदा जेबमें आया म्हणत जुन्या सहकाऱ्यानेच केला केजरीवालांचा भांडाफोड, गैरकृत्ये प्रकाशात आणण्यासाठी काढली वेब सिरीज


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : व्यवस्था परिवर्तनाचे आश्वासन देत अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची (आप) स्थापना केल्यावर अनेक सुशिक्षित लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. आपल्या बुध्दीमत्तेने आणि तंत्रज्ञानाने आपला यशही मिळवून दिले. मात्र, केजरीवाल आपल्या तत्वांपासून भरकटले असल्याचा आरोप त्यांचे जुने सहकारी करत आहेत.Kejriwal’s scandal broke out by his old colleague saying how much money is in his pocket, produced Web series to expose malpractices

केजरीवालांसाठी शिकागो सोडून आलेल्या एका डॉक्टरने तर व्यथित होऊन केजरीवाल यांची गैरकृत्ये प्रकाशातआणण्यासाठी चक्क वेब सिरीज काढली आहे.शिकागो येथे राहणारे मुळचे चंदीगड येथील डॉ. मुनीश रायजादा यांनी राजकीय शैलीतील ‘पारदर्शकता: परदर्शिता’ या वेब सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.



पारदर्शकता अपारदर्शी होण्यापर्यंत आणि राजकीय परिस्थितीचा भाग बनण्यापर्यंत पद्धतशीर बदल कसे घडले हे दाखविले आहे. प्रत्यक्ष राजकीय घटनांचे चित्रण असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वेब सिरीजची प्रसिध्दी झाली नाही. त्यामुळे रायजादा यांनी ही वेबसिरीज आता यू ट्यूबवरून प्रदर्शित केली आहे. १७ जानेवारीला यूट्यूबवर रिलीज झाली.

रायजादा म्हणतात, २०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळेपर्यंत ते पक्षासोबत होते. त्यांनी काही महिने सरकारमध्ये कामही केले. परंतु, २०२० च्या निवडणुकीपूर्वी पक्षाला मिळणाºया देणग्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. पक्ष ज्या तत्वांसाठी स्थापन झाला त्यापासून पध्दतशीरपणे भरकटविण्यात आले आहे.

रायजादा म्हणाले, आपचे माजी सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनीही या गोष्टींबद्दल आवाज उठवला. त्यामुळेच नंतर त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. केजरीवाल अजूनही तेच करत आहेत. पारदर्शक पद्धतीने मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा करून, ‘मी काम करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी मुलांच्या पिग्गी बँका फोडीन’, असे ते म्हणतात.

पण त्यांचे खरे सत्य लोकांसमोर यावे असे मला वाटले. त्यामुळे या वेब सिरीजची निर्मिती केली. २०१२ मध्ये जेव्हा केजरीवाल यांचा पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यांच्याबरोबर असलेले परंतु नंतर बाहेर पडलेल्या अनेकांच्या मुलाखती या वेबसिरीजमध्ये आहे. त्यामध्ये कुमार विश्वास, योगेंद्र यादव, मयंक गांधी, शाझिया इल्मी, शिवेंद्र चौहान आदींचा समावेश आहे. या वेबसिरीजमध्ये उदित नारायण यांनी गायलेले ‘कितना चंदा जेब में आया’ हे गाणे आहे. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

वास्तविक रायजादा यांच्या मनात पक्षातील चालेलल्या चुकीच्या गोष्टी उजेडात आणण्यासाठी वेब सिरीज काढण्याची कल्पना खूप दिवसांपासून होती. मात्र, त्यांना वेळ मिळत नव्हता. फेब्रुवारी २०२० मध्ये विधानसभेचे मतदान झाल्यावर त्यांनी वेबसिरीज पूर्ण केली. त्यानंतर रायजादा शिकागोला परतले आणि पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

Kejriwal’s scandal broke out by his old colleague saying how much money is in his pocket, produced Web series to expose malpractices

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात