केजरीवालांची लोकप्रिय योजनांची खेळी, पंजाबमध्ये आप जिंकल्यास मोफत वीज

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्याच धर्तीवर पंजाबमध्येही लोकप्रिय योजनांची खेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ठरविले आहे. पंजाबमध्ये आप जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज पुरवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.Kejriwal’s game of popular schemes, free electricity if Aap win in Punjab

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या लोकप्रिय घोषणा करत आहेत. आपचा पंजाबमधील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख असेल, असे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे.



दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल उद्या मंगळवारी चंडीगढला भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी पंजाबी भाषेत ट्विट केले आहे. त्यांनी महागाईमुळे पंजाबमधील महिलांनी आनंद गमावल्याचा दावा केला. दिल्लीत आम्ही प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत देतो. त्यामुळे महिला आनंदात आहेत. आपचे सरकार आल्यास ते पंजाबमध्ये वीज मोफत पुरवेल. उद्या तुमची भेट घेण्यास मी आतुर आहे असे ट्विट केजरीवाल यांनी केले.

पंजाबमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही आपने वातावरण तयार केले होते. मात्र, आपला याठिकाणी २० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एकूण ३८.५ टक्के मते मिळाली. तर आपला आणि अकाली दलाला अनुक्रमे २३.८ टक्के आणि २५.३ टक्के मते मिळाली आहेत. निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आम आदमी पक्षाला (आप) अपेक्षित यश मिळवता आले नाही.

याठिकाणी काँग्रेस आणि आपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, काँग्रेससमोर आपची डाळ शिजली नव्हती. त्यावेळी आपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. अरविंद केजरीवालच मुख्यमंत्री होतील असे म्हटले जात होते. त्यामुळे मतदारांनी आपला नाकारले होते. आता आपने शिख समाजाचाच मुख्यमंत्री देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी कॉँग्रेसमध्ये नाराज असलेले नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर गळ टाकण्यात येत आहे.

Kejriwal’s game of popular schemes, free electricity if Aap win in Punjab

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात