काशी विश्वनाथ धाम कॉरिडाॅर वाराणसीला नवी जागतिक ओळख प्रदान करेल; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आत्मविश्वास!!


वृत्तसंस्था

काशी : देशात आज सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा ऐतिहासिक दिवस आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडाॅरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी 01:27 मिनिटांनी मतंग मुहूर्तावर होत आहे. हे काशी विश्वनाथ धाम वाराणसीला नवी जागतिक ओळख प्रदान करेल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.Kashi Vishwanath Dham Corridor will give Varanasi a new global identity; Confidence of Chief Minister Yogi Adityanath

मुख्यमंत्री योगी यांनी काल सायंकाळी काशीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची बैठक घेऊन आजच्या उद्घाटन सोहळ्याची सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या अनेक ठिकाणांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचक्षण विकासदृष्टीतून काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर साकार झाले आहे. कॉरिडॉरचे पुढचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. 50000 वर्ग मीटरचे काम पूर्ण होऊन हा कॉरिडाॅर देशाला आणि जगाला पंतप्रधानांच्या हस्ते समर्पित करण्यात येत आहे.

जगभरातील पर्यटकांचा आणि भाविकांचा ओघ आता काशी विश्वनाथ धामाकडे वळेल. काशी विश्वनाथ जगभरातील भाविकांना आशीर्वाद देतील, असे उद्गार योगी आदित्यनाथ यांनी काढले. त्याच वेळी काशी विश्वनाथ धाम कॉरिडाॅरचे काम इतके अव्वल आणि जागतिक दर्जाचे झाले आहे की त्यामुळे वाराणसीला नवी जागतिक ओळख या कॉरिडॉरमुळे मिळणार आहे, असेही योगी यांनी स्पष्ट केले.

कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण महिनाभर देशाच्या विकासाचे महामंथन काशीमध्ये चालणार आहे. परंतु, त्यातही जगभरातील राजदूतांचे संमेलन आणि जगातील विविध देशांच्या पर्यटन मंत्र्यांचे आणि संस्कृती मंत्र्यांचे संमेलन काशीमध्ये होत आहे. याला भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात अतिशय महत्त्व आहे, हा मुद्दा योगी आदित्यनाथ यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला आहे.

Kashi Vishwanath Dham Corridor will give Varanasi a new global identity; Confidence of Chief Minister Yogi Adityanath

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात