काशी विश्वनाथ कॉरिडॉर; भाविकांमध्ये अडीच पटीने वाढ; रोजगारासह स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी बूम!!


वृत्तसंस्था

काशी : संपूर्ण काशी नगरीचा कायापालट झाला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. गेल्या 33 महिन्यांपासून या कॉरिडॉरचे काम होत असताना या कालावधीत काशी विश्वनाथ धामाला भेट देणाऱ्या भाविक दर्शनार्थींमध्ये तब्बल अडीच पटीने वाढ झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल यांनी दिली आहे.Kashi Vishwanath Corridor Project will help increase religious tourism and give a boost to the local economy here.

काशीच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला यामुळे प्रचंड चालना मिळाली असून स्थानिक कलाकारांना देखील मोठा वाव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. काशीमध्ये कॉरिडॉरचे काम सुरू असतानाच मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे देखील सुरू होती. ती यापुढे देखील सुरू राहणारच आहेत. याच कालावधीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. ७ हजारांहून अधिक स्वच्छतादूत या कामात सध्या कार्यरत आहेत. इथून पुढच्या काळातही स्वच्छता दूतांना मोठ्या प्रमाणावर काम असेल कारण भाविकांची संख्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे काम सुरू असतानाच अडीच पटीने वाढली आहे, तर काम पूर्ण झाल्यानंतर ती आणखी अनेक पटींनी वाढणार आहे, असे दीपक अग्रवाल म्हणाले.

गेली तेहतीस महिने इथे वेगवेगळ्या यंत्रांची धडधड होती. आता काशीनगरी गुलाबी रंगात सजली आहेच पण विविध फुलांच्या सुवासाने देखील भरली आहे. काशीतले प्रत्येक भवन फुलांनी सजले आहे. दीपमाळांनी उजळले आहे. येथे महिनाभर विविध कार्यक्रम चालतील पण त्याही पलिकडे जाऊन काशीनगरी आणि संपूर्ण काशी परिसराचा जो कायापालट होत आहेत तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमध्ये 40000 लोकांना हाताला प्रत्यक्ष काम मिळाले. अनुषंगिक रोजगार तर लाखोने तयार झाले. पर्यटन केन्द्रित व्यवसाय बहरले आणि हा बहार बहरले पुढील कित्येक वर्षे टिकणारा आणि वाढणार आहे.

उद्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होण्याच्या दिवशी साडेतीन लाख घरांमध्ये प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यासाठी ६०० आचारी काम करत असून त्यांनी शुद्ध देशी तुपात लाडू तयार प्रसाद रुपाने घरोघरी वाटण्यात येतील. यासाठी 7000 स्वयंसेवकांची एक मोठी तुकडी कार्यरत आहे. काशी विश्वनाथ धामकडे येणारे सर्व रस्ते पूर्ण रुंद झाले आहेत. प्रत्यक्ष काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन उद्या होत आहे. गंगा घाटावरील काम अजून सुरू आहे ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर त्याचेही उद्घाटन करण्यात येईल. हे काम सुमारे ही सर्व काम सुमारे पाच लाख वर्ग मीटर एवढे आहे, अशी माहिती दीपक अग्रवाल यांनी दिली.

Kashi Vishwanath Corridor Project will help increase religious tourism and give a boost to the local economy here.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था