कर्नाटकात मठांच्या अधिपतींचा येडियुरप्पांना पाठिंबा; काँग्रेस आमदारासकट समर्थकांकडून लिंगायत कार्डाचा वापर

वृत्तसंस्था

बेंगळुरू : कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी वेगळीच खेळी खेळायला सुरूवात केली असून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून धोका उत्पन्न होऊ नये म्हणून येडियुरप्पा समर्थकांनी लिंगायत कार्ड खेळायला सुरूवात केली आहे.Karnataka: More than 30 seers of different mutts met CM BS Yediyurappa in Bengaluru and extended their support to him.

राज्यातील विविध ३० मठांच्या अधिपतींनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येडियुरप्पा यांची भेट घेतली. त्यांनी येडियुरप्पा यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला. कर्नाटकात येडियुरप्पा आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांमुळेच भाजपची सत्ता आल्याचा या मठाधिपतींनी बजावले. हा भाजपच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींसाठी इशारा मानण्यात येतो आहे.त्याचवेळी कर्नाटकातल्या काँग्रेसचे आमदार एम. बी. पाटील यांनी येडियुरप्पांच्या बाजूने लिंगायत कार्ड खेळले आहे. येडियुरप्पा हे कर्नाटकातले मोठे लिंगायत नेते आहेत. ते जेव्हा दिल्लीला त्यांच्या पक्षनेत्यांना भेटायला गेले तेव्हाच लक्षात आले की पक्षात त्यांचे स्थान कमकुवत करण्यात येते आहे.

पण भाजपच्या श्रेष्ठींनी येडियुरप्पांच्या वयाचा मान ठेवला पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारे खाली पाहायला लावणे हे लिंगायत समूदायाला खाली पाहायला लावण्यासारखे आहे, असे वक्तव्य आमदार पाटील यांनी केले आहे.

येडियुरप्पांच्या पाठीशी अशा प्रकारे विविध मठांचे अधिपती उभे राहाणे आणि काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना लिंगायत समूदायाच्या नावाने पाठिंबा देणे यामुळे कर्नाटकातील राजकारण पुन्हा एकादा जातीय वळणावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी काँग्रेसचे नेते या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Karnataka: More than 30 seers of different mutts met CM BS Yediyurappa in Bengaluru and extended their support to him.