भारतीय आधुनिक महिला एकट्या राहू इच्छितात व मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत- कर्नाटक आरोग्य मंत्री


विशेष प्रतिनिधी

बंगलोर : कर्नाटक आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे निमित्ताने NIMHANS येथे सदर विधान केले आहे.

कर्नाटक आरोग्य मंत्री के सुधाकर रविवारी म्हणाले की, “भारतातील आधुनिक महिला या एकटे राहणे पसंत करतात तसेच लग्नानंतर मुलांना जन्म देण्यापेक्षा सरोगसिने जन्म देऊ इच्छितात. वृत्तसंस्था पीटीआयने हे वृत्त दिले आहे. ते पुढे म्हणाले की, “भारतीय समाजावर पाश्चिमात्य यांचा  प्रभाव दिसत असून हल्ली आपल्या आई-वडिलांना सांभाळण्यास लोक तयार नसतात.”

Karnataka Health Minister, Dr. K Sudhakar on world mental health day

वर्ल्ड मेंटल हेल्थ डे च्या निमित्ताने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोलॉजिकल सायन्सेस येथे बोलताना ते म्हणाले की, “मला हे बोलताना दुःख होत आहे की तिकडे बऱ्याच महिला एकट्या राहू इच्छितात आणि जरी लग्न केले तरी मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. सरोगसी सारखी माध्यमे ते वापरू इच्छितात. हा विचारातील फार मोठा बदल आहे आणि तो चांगला नाही.”


Measures to prevent violence against healthcare workers


ते पुढे म्हणाले, “दुर्दैवाने आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण करू लागलो आहोत आणि आजी आजोबा तर दूरच पण आपल्या आईवडिलांना पण आपल्याजवळ ठेवू इच्छित नाही.” मानसिक आरोग्य विषयी बोलताना म्हणाले की, प्रत्येक सातवा भारतीय कोणत्या न कोणत्या मानसिक त्रासाने ग्रस्त आहे. ते म्हणाले की स्ट्रेस मॅनेजमेंट ही एक कला असून आपल्या पूर्वजांनी योगा आणि ध्यान शिकवले आहे. त्याचा भारतीयांनी अवलंब केला पाहिजे. आपण जगाला ताण व्यवस्थापन शिकवले पाहिजे. कारण योग, ध्यान व प्राणायाम हा आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी शिकविला आहे.”

सुधाकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे कर्नाटकला सप्टेंबरपासून १५ कोटी कोरोना लस पुरवल्याबद्दल आभार मानले आहेत. यामुळे राज्यातील लसीकरण व्याप्ती वाढली आहे. मंत्री पुढे म्हणाले की, “केंद्राने देखील लसीकरणाचे काम हातात घेतल्यापासून ९४ कोटी लस पुरवल्या आहेत. लसीकरण मोफत करण्यात आले आहे. भारत हा पहिलाच देश आहे जो लस मोफत पुरवत आहे. इतर ठिकाणी लोकांना १५०० ते ४००० रुपये एका डोसमागे द्यावे लागत आहेत.”

Karnataka Health Minister, Dr. K Sudhakar on world mental health day

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात