१५ एप्रिल रोजी काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. राजकीय पक्षांकडून एकामागून एक पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या जारी केल्या जात आहेत. या क्रमवारीत भारतीय जनता पक्षाने आज म्हणजेच सोमवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. Karnataka Elections 2023 BJP announced the third list of candidates
भाजपाने या यादीत १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे आमदार अरविंद लिंबवली यांच्या पत्नी मंजुळा अरविंद यांना तेंगीनाकाई मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेसने ४३ उमेदवारांची नावे केली जाहीर –
भाजपाच्या तिसऱ्या यादीनुसार, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची जागा असलेल्या हुबळी धारवाड सेंट्रलमधून महेश तेंगीनाकई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच भाजपने कृष्णराज येथील विद्यमान आमदार रामदास यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी पक्षाने श्रीवास्त यांना तिकीट दिले आहे.
याआधी १५ एप्रिल रोजी काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. या यादीत काँग्रेसने कोथुर्जी मंजुनाथ यांना कोलार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
कर्नाटक: भारतीय जनता पार्टी ने कर्नाटक विधानसभा चुनाव के लिए पार्टी उम्मीदवारों की तीसरी सूची जारी की।#KarnatakaElections2023 pic.twitter.com/9omvED3HjR — ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023
कर्नाटक: भारतीय जनता पार्टी ने कर्नाटक विधानसभा चुनाव के लिए पार्टी उम्मीदवारों की तीसरी सूची जारी की।#KarnatakaElections2023 pic.twitter.com/9omvED3HjR
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023
विशेष म्हणजे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोलार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, परंतु पक्षाने त्यांना वरुणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App