god statue broken : मंगळवारी सकाळी छिबरामाऊ येथे तणाव निर्माण झाला. येथे काही लोक संतप्त घोषणा देत मंदिरात घुसले आणि मूर्तींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही भाविक तेथे आल्यावर या समाजकंटकांनी तेथून पळ काढला, त्यापैकी एका तरुणाला पकडण्यात आले, भक्तांनी मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. याची माहिती मिळताच मंदिरात मोठा जमाव जमला आणि आरोपींविरोधात कारवाईची मागणी करत गोंधळास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाला समजावून कारवाईचे आश्वासन दिले. kanpur city tension create in chhibramau kannauj after god statue broken in temple
विशेष प्रतिनिधी
कन्नौज : मंगळवारी सकाळी छिबरामाऊ येथे तणाव निर्माण झाला. येथे काही लोक संतप्त घोषणा देत मंदिरात घुसले आणि मूर्तींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही भाविक तेथे आल्यावर या समाजकंटकांनी तेथून पळ काढला, त्यापैकी एका तरुणाला पकडण्यात आले, भक्तांनी मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. याची माहिती मिळताच मंदिरात मोठा जमाव जमला आणि आरोपींविरोधात कारवाईची मागणी करत गोंधळास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाला समजावून कारवाईचे आश्वासन दिले.
विजयनाथ मंदिर छिबरामाऊच्या मुख्य विजयपाल चौकात आहे. ज्यामध्ये शिवलिंग, नंदी आणि नागराज यांच्या मूर्ती आहेत. राम दरबार, हनुमानजी आणि देवीच्या मूर्तीदेखील मंदिरात स्थापित केल्या आहेत. याशिवाय साईंचा पुतळादेखील बसवला आहे. सकाळी आठच्या सुमारास काही भाविक मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, कासावन परिसरातील एक तरुण मोठमोठ्याने घोषणा देत मूर्ती तोडत होता. दरम्यान, त्याचे आणखी पाच-सहा साथीदार हजर झाले, जे भाविकांना पाहून पळून गेले. भाविकांनी पाठलाग करून कासावन परिसरातील तरुणाला पकडले आणि बेदम मारहाण केली. पोलिसांना माहिती मिळताच लोकांनी आरोपी तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अटक केलेल्या युवकाने सांगितले की, त्याला तसे करण्यास सांगितले गेले, पण कोणी त्याला सांगितले, याचे उत्तर त्याने दिले नाही. सध्या पोलिस त्याची चौकशी करीत आहेत. मंदिरातील तोडफोडीची माहिती मिळताच लोक जमा झाले आणि आरोपींच्या अटकेसंदर्भात घोषणाबाजी सुरू झाला. रस्त्यावर बसलेल्या लोकांना समजवण्यासाठी एसडीएम देवेश कुमार गुप्ता आणि सीओ शिवकुमार थापा पोहोचले. त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने ऐकले नाही. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू राहिला, तणाव वाढल्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले उमर फारुक ऊर्फ बंटी हा बिरटिया मोहल्लाचा रहिवासी आहे. तक्रारीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.
kanpur city tension create in chhibramau kannauj after god statue broken in temple
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App