बांधकाम कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे देवेगौडा यांना आदेश

वृत्तसंस्था

बंगळूर : एका बांधकाम कंपनीची बदनामी करून नुकसान केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. Defamation of a construction company ; Deve Gowda ordered to pay Rs 2 crore

नंदी इंफ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर इंटरप्रायजेस, असे कंपनीचे नाव आहे. २०११,मध्ये देवेगौडा यांनी कंपनीविरोधात एका वाहिनीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे कंपनीचे १०कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. देवेगौडा सुद्धा न्यायालयात त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण किंवा खुलासे करण्यात अपयशी ठरले होते. तसेच देवेगौडा यांनी भविष्यात अशी विधाने करू नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

विशेष म्हणजे कंपनीच्या प्रकल्पाबाबत कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले असताना देवेगौडा यांनी बदनामीकारक वक्तव्य करून कंपनीचे नुकसान केले होते.

Defamation of a construction company ; Deve Gowda ordered to pay Rs 2 crore