कानपूर : मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून मारला फेरफटका

कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे. शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.Kanpur: After the inauguration of the Metro project, Prime Minister Narendra Modi took a tour of the Metro today


विशेष प्रतिनिधी

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. गेली दोन वर्षे या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होतं. कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून फेरफटका मारला.

आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असं अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केलं.यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील उपस्थित होते.



उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच या प्रकल्पाचं उद्धाटन झाल्याने निवडणुकीतही याचा फायदा होणार हे निश्चित.अस म्हणलं जात की ,कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे.

शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.जानेवारी २०२२ मध्ये या मेट्रोचा आणखी एक भाग खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Kanpur: After the inauguration of the Metro project, Prime Minister Narendra Modi took a tour of the Metro today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात