कुलदीप यादवला गेस्ट हाऊसवर कोरोना लस;चौफेर टीकेनंतर कानपूर जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश


  • भारतात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोरोना लस घेण्यास बंधनकारक केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनीही कोरोना लसीचा पहिला डोस नुकताच घेतला. विराट कोहली, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, कुलदीप यादव यांनी हा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना लसीचा दुसरा डोस लंडनमध्ये देण्यात येणार आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याला कोरोना लस घेणे महागात पडणार आहे.

विशेष प्रतिनिधी 

कानपुर : टीम इंडियाचा गोलंदाज कुलदीप यादव याने शनिवारी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर त्याने लस घेतानाचा फोटो शेअर करत लस घेण्याचे आवाहन देखील केले. मात्र हा फोटो समोर आल्यानंतर कुलदीपला लसीकरणासाठी गेलेली व्हिआयपी ट्रीटमेंट यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.Kanpur Administration order inquiry Cricketer kuldeep yadav take Corona Vaccine At Guest House

 

त्याच्यासाठी या VIP ट्रिटमेंटची कानपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होणार आहे.

 

कुलदीप यादव याला कानपूरमधील गोविंदनगर येथील जागेश्वर हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस टोचण्यात येणार होती. मात्र त्याने लस घेतानाचा जो फोटो टाकला आहे ते कानपूर नगर निगम गेस्ट हाऊसचा आहे. कोरोनाची लस ही रुग्णालयात किंवा अधिकृत सेंटरवरच मिळते मग कुलदीप यादवसाठी लस गेस्ट हाऊसवर कशी आणली गेली असा सवाल केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी देखील रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे.मग कुलदीप यादवसाठी प्रोटोकॉल का तोडण्यात आले याचा सध्या तपास सुरू आहे. जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अपर जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना .या प्रकरणी लवकरात लवकर रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.

 

Kanpur Administration order inquiry Cricketer kuldeep yadav take Corona Vaccine At Guest House

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात