Johnson And Johnson ने भारतातील लसीच्या मंजुरीसाठीचा अर्ज घेतला मागे, कारण अद्याप अस्पष्ट

Johnson And Johnson Withdraws Its Application For Coronavirus Vaccine In India

Johnson And Johnson : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनाविरोधी लसीसाठी भारतात लवकर मंजुरीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. कंपनीने या घडामोडीमागील कारण जाहीर केलेले नाही. भारतीय औषध नियामक DCGI ने सोमवारी ही माहिती दिली. जॉन्सन अँड जॉन्सनने यावर्षी एप्रिल महिन्यात भारतात आपल्या लसीच्या चाचण्यांसाठी अर्ज केला होता. Johnson And Johnson Withdraws Its Application For Coronavirus Vaccine In India


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनाविरोधी लसीसाठी भारतात लवकर मंजुरीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. कंपनीने या घडामोडीमागील कारण जाहीर केलेले नाही. भारतीय औषध नियामक DCGI ने सोमवारी ही माहिती दिली. जॉन्सन अँड जॉन्सनने यावर्षी एप्रिल महिन्यात भारतात आपल्या लसीच्या चाचण्यांसाठी अर्ज केला होता.

याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. भारत सध्या दुष्परिणामांपासून संरक्षणाच्या मुद्द्यांवर लस उत्पादकांसमवेत कायदेशीर आव्हानांचा सामना करत आहे. आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी पूर्वी म्हटले होते की, लस उत्पादकांशी चर्चा करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. हे मुद्दे फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्याबाबत आहेत.

दरम्यान, भारतात आतापर्यंत चार कोरोनाविरोधी लसींच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये भारत बायोटेकची स्वदेशी लस Covaxin, Oxford-AstraZeneca ची Covishield, रशियाची Sputnik V आणि Modernaच्या लसीचा समावेश आहे. अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या लसीला DCGI ने जूनमध्येच आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती.

Johnson And Johnson Withdraws Its Application For Coronavirus Vaccine In India

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण