Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या सिंगल शॉट लसीच्या आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारकडे मंजुरी मागितली आहे. कंपनीने सोमवारी सांगितले होते की, ते आपली सिंगल-डोस कोविड लस भारतात आणण्यास वचनबद्ध आहेत आणि या संदर्भात भारत सरकारसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. Johnson And Johnson Brought Single Dose Corona Vaccine Sought Permission For Use Against Corona
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या सिंगल शॉट लसीच्या आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारकडे मंजुरी मागितली आहे. कंपनीने सोमवारी सांगितले होते की, ते आपली सिंगल-डोस कोविड लस भारतात आणण्यास वचनबद्ध आहेत आणि या संदर्भात भारत सरकारसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे, “जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडने 5 ऑगस्ट 2021 रोजी भारत सरकारकडे त्यांच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीच्या EUA साठी अर्ज केला.” निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने बायोलॉजिकल ई लि. शी केलेला करार हा भारतातील आणि उर्वरित जगाच्या लोकांना कोविड लसीचा एकाच डोसचा पर्याय देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
दरम्यान, नुकतेच आरोग्य मंत्रालयाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीसंदर्भात एक निवेदनही दिले आहे. नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, भारत सरकारच्या योजनेनुसार ही लस बायो-ई, हैदराबाद येथेदेखील तयार केली जाईल. सध्या देशात 4 कोरोना लसींना आणीबाणीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे, ज्यात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना लसीचा समावेश आहे. जर जॉन्सन अँड जॉन्सनला मान्यता मिळाली, तर ती भारतातील पाचवी लस असेल. तथापि, ही भारतातील पहिलीच सिंगल-डोस लस असणार आहे.
Johnson And Johnson Brought Single Dose Corona Vaccine Sought Permission For Use Against Corona
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App