विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले जेएनयूचे विद्यार्थी नताशा नरवाल, देवांगणा कलिता आणि जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आसिफ इक्बाल तान्हा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.JNU students get bail after one year
बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्यान्वये त्यांना अटक करण्यात आली होती. या तिघाजणांना मागील वर्षी मे महिन्यामध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने या दोघांनाही जामीन नाकारला होता, ते आदेश मात्र उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले.
या सर्व आरोपींना कोणत्याही प्रकारच्या बेकायदा कारवाईमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला असून जो पत्ता तुरुंगाच्या रेकॉर्डमध्ये नोंद आहे, तिथेच वास्तव्य करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असेन. मागील वर्षी २४ फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्यावरून झालेल्या हिंसाचारामध्ये ५३ जण ठार झाले होते तर २०० जण जखमी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App