Jammu-kashmir : कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक , एका दहशतवाद्याचा खात्मा , एक पोलीस शहीद

दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.मात्र, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. Jammu-Kashmir: Clashes between security forces and militants in Kulgam district, one terrorist killed, one policeman martyred


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.दरम्यान या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला ठार केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीतच एक पोलीस शहीद झाले आहे.तसेच तीन जवानांसह दोन नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.



पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुलगाम जिल्ह्यातील परिवान भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.मात्र, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले.

पोलीस महानिरीक्षक (कश्मीर प्रदेश) विजय कुमार यांनी ट्विट केले, ‘एक पोलीस कर्मचारी रोहित छिब शहीद झाले, लष्कराचे तीन जवान जखमी झाले.दोन नागरिकांना किरकोळ दुखापत झाली.दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी मारला गेला. ऑपरेशन सुरू आहे. ‘

Jammu-Kashmir : Clashes between security forces and militants in Kulgam district, one terrorist killed, one policeman martyred

महत्त्वाच्या बातम्या