बहराबाद हाजीन भागातून एलईटी तैयबाच्या एका दहशतवादी साथीदारास स्फोटकांसह अटक करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : कुपवाड्याला लागून असलेल्या नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भारतीय लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली. Jammu and Kashmir Two terrorists killed near Line of Control in Kupwara security forces operation underway
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील डोबनार माचल भागात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या कारवाईत दहशतवादी मारले गेले. तर या ठिकाणी शोध मोहीम अजूनही सुरू आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटू शकली नाही. दहशतवाद्यांनी नुकतीच घुसखोरी केली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तत्पूर्वी, बांदीपोरा पोलिसांनी १३ राष्ट्रीय रायफल्स आणि ४५ बीएम सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत बहराबाद हाजीन भागातून एलईटी तैयबाच्या एका दहशतवादी साथीदाराला अटक केली. त्याच्याकडून दोन चिनी हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी रविवारी (11 जून), श्रीनगर-स्थित 15 व्या कॉर्प्स किंवा चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी), लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजला म्हणाले की, नियंत्रण रेषेच्या पलीकडे बसलेले लोक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याने सुरक्षा दलांना सतर्क राहण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App