कोण बडा हिंदुत्ववादी आणि हिंदू भक्त यावरच भाजप काँग्रेसमध्ये संघर्ष, अन्य धर्मियांची उपेक्षा; मायावतींचे बऱ्याच दिवसांनी टीकास्त्र

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती आज बऱ्याच दिवसांनी पत्रकारांसमोर आले मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करताना मायावतीने एकाच वेळी भाजपा आणि काँग्रेस यांच्यावर शरसंधान साधले. The struggle between BJP and Congress is about who is the biggest Hindutva and Hindu devotee

कोण बडा हिंदुत्ववादी आणि हिंदू भक्त?,कोण जास्त पूजा पाठ करतो?, यावरच भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा संघर्ष सुरू आहे. हे दोन्ही पक्ष बाकीच्या धर्मियांची उपेक्षा करत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला. त्याचबरोबर 2023 मधल्या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढण्याची घोषणा देखील मायावती यांनी केली.

2012 मध्ये मायावतींनी समाजवादी पक्षाची युती करून उत्तर प्रदेशची निवडणूक लढवली होती. पण त्यानंतरची कोणतीही निवडणूक मायावतींनी कोणत्याही पक्षाबरोबर युती अथवा आघाडी करून लढवली नाही. 2014 ची लोकसभा निवडणूक, 2017 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, 2019 ची लोकसभा निवडणूक, त्यानंतर 2022 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक तसेच विविध राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका मायावती यांनी बहुजन समाज पक्षाच्या बळावरच लढवल्या.

त्यात त्यांची मतांची टक्केवारी कमालीची घटलेली दिसली. त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय मान्यतेवर प्रश्नचिन्ह देखील लागले आहे. पण तरीदेखील मायावती यांनी 2023 मधल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे उतरण्याचे ठरविले आहे.

The struggle between BJP and Congress is about who is the biggest Hindutva and Hindu devotee

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात