वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि तीन जखमी झाले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोपियान जिल्ह्यातील द्रागड परिसरात घेराव घालत शोधमोहीम सुरू केली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.Jammu and kashmir security forces killed 2 TRF terrorists in shopian, three soldiers injured in the encounter
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याने ऑपरेशन चकमकीत बदलले. गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तरही दिले. अधिकारी म्हणाले की, चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, मारलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आदिल वाणी आहे, जो गेल्या शनिवारी सुतार सगीर अन्सारीच्या हत्येमध्ये सामील होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर शोपियान जिल्ह्यातील द्रागड परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहीम चकमकीत बदलली.
टीआरएफचे दोन अतिरेकी ठार
लष्कर-ए-तैयबाचीच उपसंघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चे दोन अतिरेकी ठार झाले आहेत, तर ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयजीपीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आदिल वानी म्हणून ओळखला गेला आहे. आतापर्यंत 2 आठवड्यांत 15 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App