नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमध्ये स्वा. सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे उद्घाटन; विविध कायदे कौशल्य विशेष प्रशिक्षणास सुरुवात


वृत्तसंस्था

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोडिया लॉ कॉलेजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठाचे उद्घाटन पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि प्रख्यात कायदे तज्ञ जगदीप धनकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. Jagdeep Dhankhar attended the inaugural ceremony of Swatantryaveer Sawarkar Smruti Abhinav Bharat Vyaspeeth as chief guest

स्वातंत्र्यवीर सावरकर हे डेक्कन एज्युकेशनच्या सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी. या विद्यार्थिदशेतच त्यांच्या क्रांतिकार्याला सुरूवात झाली. अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतिकारक संघटनेची स्थापना याच काळात त्यांनी केली. 1905 मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी असतानाच त्यांनी भारतातली पहिली परदेशी कपड्यांची होळी केली. त्याला लोकमान्य टिळक आणि काळकर्ते शिवराम महादेव परांजपे उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान याचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीने नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमध्ये सावरकरांनी स्थापन केलेल्या क्रांतिकारी संघटनेच्या नावाने स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत व्यासपीठ सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन राज्यपाल जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायदे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये कायदे कौशल्य (Advocacy skills), वैद्यकीय कायदे प्रशिक्षण (Medico – legal studies), तसेच कायदा आणि अर्थशास्त्र (Law and economics) या विषयांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने Atal lawlit Festival घेण्यात येणार आहे. हा उपक्रम कायदेविषयक जनजागृतीसाठी नवलमल फिरोडिया लॉ कॉलेज तर्फे घेण्यात येणार आहे.

Jagdeep Dhankhar attended the inaugural ceremony of Swatantryaveer Sawarkar Smruti Abhinav Bharat Vyaspeeth as chief guest

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात