वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना काळात निर्बंध सोशल डिस्टेसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून जनरल डबा काढून टाकला होता. प्रवाशांना तेव्हापासून द्वितीय श्रेणीसाठीही आगाऊ आरक्षण करावे लागत होते. पण अनारक्षित तिकिटांची विक्री झाल्यानंतर प्रवाशांना लवकरच जनरल तिकीट खरेदी करून जनरल डब्यातून प्रवास करता येणार आहे. It will now be connected to long-distance trains General Coach bogy again; Consolation to ordinary passenger
रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन गाड्यांमधील जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या गरीब, सामान्य प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात, पूर्वीप्रमाणे सर्व गाड्या पूर्ववत करण्यात आल्या असून जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रवाशांना आता पूर्वीप्रमाणेच जनरल तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना आता जनरल तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App