आप नेत्यांची जीभ घसरली; “केंद्र सरकार हे सडक छाप गुंड”, अशी भाषा वापरली


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – दिल्ली राज्याचे आप सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात एक देश – एक रेशनकार्ड योजनेवरून घमासान सुरू असताना केंद्र सरकारवर टीका करताना आप नेत्यांची जीभ घसरली आहे. It seems that the GoI has decided to occupy role of petty criminals, ‘sadak chaap gundas’., AAP leader Atishi

केंद्र सरकार आता सडक छाप गुंडगिरी करतेय, अशी टीका आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी केली आहे. केंद्र सरकारला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम नीट चालवता येत नाही. त्यांना धान्याचे वाटप देखील योग्य करता येत नाही. सदा सर्वकाळ भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राज्यांशी भांडत बसतात. ते सडक छाप गुंडांसारखे वागतात, अशी टीका आतिशी यांनी केली आहे.

दिल्ली सरकारने एक देश – एक रेशकार्ड ही योजना का लागू केली नाही, असा सवाल केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आतिशी यांनी सडक छाप गुंडा अशा भाषेत प्रत्युत्तर दिले.

पिझ्झा सुध्दा प्रत्येकाच्या घरी डिलीव्हर होऊ शकतो. मग अन्नधान्याचे वाटप गरीबांच्या घरोघरी का नाही होऊ शकत, असा सवाल आतिशी यांनी केला. याच केंद्र सरकारने नोटबंदी करून लोकांना बँकांच्या दारात तासन तास उभे केले होते. आता त्यांना लोकांना रेशनच्या रांगांमध्ये उभे करायचे आहे, असा आरोपही आतिशी यांनी केंद्र सरकारवर केला.

It seems that the GoI has decided to occupy role of petty criminals, ‘sadak chaap gundas’., AAP leader Atishi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात