महाराष्ट्राचा ‘सुपरस्प्रेडर’ उल्लेख दुर्दैवी; सुप्रिया सुळे यांची मोदींच्या भाषणावर जोरदार टिका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचा ‘सुपरस्प्रेडर’ असा केला उल्लेख धक्कादायक आहे. त्यांच्याकडून या विधानाची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राची लेक आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून आपल्याला प्रश्न विचारते की, आपण महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारे वक्तव्य का केले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. It is unfortunate that Maharashtra is mentioned as a ‘super spreader’ Supriya Sule strongly criticizes Modi’s speech

मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान सोमवारी संसदेत महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला असा उल्लेख केला असा दावा होत आहे. या उल्लेखानंतर सुळे यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मोदी यांना उददेशून कोरोनाच्या काळात लोकांनी एकमेकांना मदत केली. माणूसकीचे दर्शन घडविले. ‘प्रधानमंत्रीजी, आप से नाराज नहीं हूँ, हैरान हूँ मै आपसे’, असा उल्लेख केला.

त्या म्हणाल्या की, “तुम्ही आज माझ्या महाराष्ट्राबद्दल आम्ही सुपस्प्रेडर आहोत असं विधान का केले. महाराष्ट्राची लेक म्हणून मी आज तुमच्याकडे न्याय मागत आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपाचे १८ खासदार निवडून देऊन नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी महाराष्ट्रावर अशा प्रकारे केलेले आरोप हे दुर्दैवी असून त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा हा अपमान आहे.



सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातील वाढली महागाई, बेरोजगारी, कोरोना या स्थितीबाबत एक ‘स्टेटसमन’ म्हणून पंतप्रधान काहीतरी आश्वासकपणे बोलतील, त्यांच्या भाषणातून देशाला दिशा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती.पण ते भाषणादरम्यान ते आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले ते खुप दुःखद आहे. ज्या राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले.त्यांना पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राच्याही मतदारांचाही मोलाचा हात आहे.त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान त्यांनी कोविड सुपरस्प्रेडर म्हणून केला. हे धक्कादायक आहे.

एकदा निवडून आले की ते देशाचे प्रधानमंत्री असतात. हे पद या देशातील सर्वात महत्वाचे आहे. पण ते एका राज्याच्या वतीने बोलत होते. हे दुर्दैवी आहे अशी टिपण्णी करुन सुप्रिया सुळे यांनी कोरोना काळातील श्रमिक ट्रेन्सची आकडेवारीच सादर केली. याशिवाय तत्कालिन रेल्वेमंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीटस्, विधाने आणि पत्रव्यवहार यांचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले.

त्या म्हणाल्या की महाराष्ट्र सरकार फारतर एसटी बस किंवा खासगी वाहन सुविधा उपलब्ध करुन देऊ शकते. रेल्वेची सुविधा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. कोरोना काळात गुजराजमधून १०३३ तर महाराष्ट्रातून ८१७ श्रमिक ट्रेन्स सुरु करण्यात आल्या होत्या. रेल्वे केंद्र सरकार चालविते, महाराष्ट्र नाही, त्यामुळे जेंव्हा प्रधानमंत्री सांगतात की महाराष्ट्राने कोविड पसरविला तेंव्हा मला याची आठवण करुन द्यावी लागेल की आम्ही रेल्वे देऊ शकत नाही.

त्या म्हणाल्या की, ” पियुषजी गोयल हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी २४ मे रोजी पाच ट्वीट केले आहेत. त्यामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उद्देशून म्हणत आहेत की आम्ही १२५ श्रमिक ट्रेन्स पाठवित आहोत. यासंदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिले आहे.हा पुरावा आहे. मी हे बोलतेय कारण प्रधानमंत्री महाराष्ट्राला लक्ष्य करुन बोलत आहेत. हे वेदनादायी आहे. देवेंद्रजींनी देखील श्रमिक ट्रेन्सबाबत पियुष गोयल यांचे आभार मानले आहे. हा सर्व संवाद सोशल मिडियावर उपलब्ध असून महाराष्ट्राबाबत सातत्याने गैरसमज पसरविण्यात येत आहे.

It is unfortunate that Maharashtra is mentioned as a ‘super spreader’ Supriya Sule strongly criticizes Modi’s speech

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात