विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पत्रकार असद अली तूर यांनी आपल्यावरील हल्ल्यामागे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेच्या सदस्यांचा हात असल्याचा आरोप केला. घरात घुसलेल्या हल्लेखोरांनीच आपण आयएसआयचे हस्तक असल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. ISI agent beats journalist in Pakistan
पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबाबत तूर यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी सांगितले की, अवैध कारवाया पत्रकार उजेडात आणतात तेव्हा सरकारच्या क्रोधाचा भडका उडतो. त्यातून पत्रकारांना लक्ष्य केले जाते. जो कुणी त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात आवाज उठवेल त्याला सोडले जाणार नाही असाच इशारा प्रसार माध्यमांना दिला जातो. त्यांची गळचेपी केली जाते. तूर यांनी सत्ताधाऱ्यांवर वेळोवेळी टीका केली आहे. मंगळवारी रात्री इस्लामाबादमधील त्यांच्या इमारतीत घुसून हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली.
तूर म्हणाले की, याआधी मी हल्लेखोरांना कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे ते खरोखरच आयएसआयचे हस्तक आहेत का हे मला माहीत नाही, पण आपण आयएसआयचे आहोत या त्यांच्या म्हणण्यावर मी विश्वास ठेवेन. आता हे शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App