खरंच दरडोई उत्पन्नात बांग्लादेश भारताच्या पुढे आहे? केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत सादर केली आकडेवारी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दरडोई उत्पन्नात बांग्ला देश भारताच्या पुढे गेल्याचे सांगून विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. मात्र, आयएमएफ आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकच्या अहवालानुसार भारताचे दरडोई उत्पन्न एप्रिल २०२१ मध्ये ७३३२.९ अमेरिकी डॉलर इतके होते.Is Bangladesh really ahead of India in per capita income? Statistics presented by Union Minister of State for Finance in Parliament

बांगलादेशमध्ये हाच आकडा ५८११.६ अमेरिकी डॉलर इतका होता. यावरुन भारतच पुढे असल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यंमत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली.गेल्या वर्षी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) दरडोई उत्पन्नामध्ये बांगलादेश भारतालाही मागे टाकण्याची शक्यता आहे, असा अहवाल प्रकाशित केला होता. याच मुद्द्यावरुन संसदेत रणकंदन सुरू आहे.

आयएमएफनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार खरंच बांगलादेश २०२१ मध्ये दरडोई उत्पन्नात भारताला मागे टाकणार आहे का? असा सवाल सरकारला विचारण्यात आला. त्यावर सरकारकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बाजू मांडली.

आयएमएफ आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकच्या (हएड) अहवालानुसार भारतात दरडोई उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करायचा झाल्यास एप्रिल २०२१ मध्ये ७३३२.९ अमेरिकी डॉलर इतका होता. बांगलादेशमध्ये हाच आकडा ५८११.६ अमेरिकी डॉलर इतका होता.यावरुन भारतच पुढे असल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती पंकज चौधरी यांनी संसदेत दिली.

आयएमएफच्या माहितीनुसार एप्रिल २०२१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था १२.५ टक्के इतक्या दरानं वाढली आहे. हा आजवरचा विक्रम आहे, असं पंकज चौधरी म्हणाले. भारताचं दरडोई उत्पन्न २०१६ साली बांगलादेशपेक्षा ४१ टक्क्यांनी अधिक होते.

त्यावेळी भारताचं दरडोई उत्पन्न ५८३९.९ अमेरिकी डॉलर, तर बांगलादेशचं ४११८.९ अमेरिकी डॉलर इतकं होतं. यंदाच्या वर्षात बांगलादेश सरकारकडून काही आकडे जारी करण्यात आले. त्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास बांगलादेश दरडोई उत्पन्नात भारतापेक्षा पुढे निघून गेला आहे.

बांगलादेश सरकारच्या दाव्यानुसार देशातील दरडोई उत्पन्न २२२७ डॉलर पर्यंत पोहोचलं आहे. हाच आकडा २०१९-२० या वर्षात २०६४ डॉलर इतका होता. भारताशी तुलना केल्यास दरडोई उत्पन्नाचा भारताचा आकडा १९४७.४१ डॉलर इतका आहे.

भारतीय अर्थ विश्लेषकांनी बांगलादेश सरकारनं जारी केलेले आकडे नाकारले आहेत. अर्थशास्त्रज्ञाच्या माहितीनुसार बांगलादेश एक लेबर इंटेसिव्ह एक्सपोर्ट इकोनॉमीवर आधारलेला देश आहे. त्यामुळे तो भारताला मागे टाकू शकेल असा विचार करणं चुकीचं आहे.

भारतात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित होत असताना बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या आकड्यांची तुलना केली जाऊ शकत नाही.

Is Bangladesh really ahead of India in per capita income? Statistics presented by Union Minister of State for Finance in Parliament

महत्त्वाच्या बातम्या