UPI मार्फत स्टेशनवर तिकीट बुक केले तरी मिळणार ५ टक्के सूट ; रेल्वेचा मोठा निर्णय


ऑनलाईन आरक्षित तिकिटांच्या बुकिंगसाठी यापूर्वी 5 टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती.


UPI मार्फत रेल्वे काऊंटरवर तिकीट बुकिंगच्या पेमेंटमध्येही 5 टक्के सूट मिळणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रभाव पाहता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे . तिकीट बुकिंगदरम्यान रोख रक्कम घेणारा देणे टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे . आता UPI च्या माध्यमातून पीआरएस काऊंटरवर आरक्षित तिकीट बुकिंगच्या रकमेवर 5 टक्के सूट मिळू शकेल. ऑनलाईन आरक्षित तिकिटांच्या बुकिंगसाठी यापूर्वी 5 टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. पण आता UPI मार्फत रेल्वे काऊंटरवर तिकीट बुकिंगच्या पेमेंटमध्ये सूट मिळणार आहे. Irctc Ticket Booking : Indian Railways giving 5 Percent Discount On Train Ticket

पुढील वर्षी 12 जूनपर्यंत

पुढील वर्षाच्या 12 जूनपर्यंत प्रवासी UPI च्या रकमेवर 5% सवलतीच्या सुविधेचा लाभ घेण्यास सक्षम असतील. कोरोना संक्रमणाच्या वेळी प्रवाशांना रोखीची रक्कम टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलाय. UPI द्वारे पेमेंट केल्यास प्रवाशांना पीएनआरवर सूट मिळणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलंय. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढताना, प्रवासात आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. कोरोनाच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ‘संवेदनशील उत्पत्ती’ च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Irctc Ticket Booking : Indian Railways giving 5 Percent Discount On Train Ticket

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण