विशेष प्रतिनिधी
तेहरान : मुस्लीम जगतातील महत्वाचा देश मानला गेलेल्या इराणमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान झाले. इराणचे सर्वोच्च धार्मीक नेते अयातुल्ला खोमेनी यांचेच तेथे वर्चस्व असल्याने निवडणुकांना फारसे महत्व दिले जात नाही. त्यांच्या मर्जीतील कट्टर नेत्याचाच विजय होण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने नागरिकांनी मतदानामध्ये फारसा उत्साह दाखविला नाही. Iran will choose new president
इराण आणि अमेरिकेतील संबंध विकोपाला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे निवडणूक होत असल्याने तणाव निवळण्यासाठी तुलनेने मवाळ असलेले अब्दुलनासर हेम्मती यांच्या निवडीची जनतेला अपेक्षा होती. मात्र, खामेनी यांचा रायसी यांच्याकडेच कल असल्याने तेच निवडून येण्याची शक्यता अधिक आहे.
माजी अध्यक्ष हसन रोहानी यांचा कार्यकाल संपल्याने आणि घटनेनुसार त्यांना पुन्हा अध्यक्ष होता येत नसल्याने त्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र, इब्राहिम रायसी आणि इतर तिघे जण पदाच्या शर्यतीत आहेत. इराणचे मुख्य न्यायाधीश असलेले रायसी हे कट्टरतावादी असून १९८८ मध्ये राजकीय नेत्यांच्या झालेल्या हत्यांशी त्यांचा संबंध आहे. अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्यास पदावर येण्याच्या आधीपासूनच अमेरिकेचे निर्बंध असलेले ते इराणचे पहिले अध्यक्ष ठरणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App