विशेष प्रतिनिधी
मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर-५० मध्ये राहणाºया माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्यावर तब्बल ६०० लॉकर सापडले आहेत. त्यातील एकाच लॉकरमधून दोन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.IPS officer’s deed, 600 lockers, Rs 2 crore seized from a single locker
घराच्या तळघरात बांधलेल्या या खासगी लॉकर्सपैकी एका लॉकरमध्ये सुमारे दोन कोटी रुपये आणि उर्वरित दोन लॉकरमधील ३० ते ३५ लाख रुपये आयकर विभागाच्या पथकाने जप्त केले आहेत. हे तिन्ही लॉकर सोमवारी रात्री उशिरा तोडण्यात आले .आणखी दोन संशयास्पद लॉकर लवकरच फोडले जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर-५० येथील या घरात आर.एन. सिंह यांचा मुलगा सुयश आणि त्याचे कुटुंबीय राहतात. माजी आयपीएस अधिकारी आणि त्यांची पत्नी मिझार्पूर येथे राहतात. आयकर विभागाच्या पथकाने माजी आयपीएस अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड ठेवल्याच्या माहितीच्या आधारे शनिवारी छापा टाकला होता.
जेव्हा आयकर पथक घराच्या आत पोहोचले तेव्हा तळघरात सुमारे ६०० खाजगी लॉकर सापडले. हे लॉकर्स इतर लोकांचे असल्याचे सांगितले जात आहे. हे लॉकर्स इतरांना भाड्याने देण्यात आले होते. प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी त्या लोकांशी संपर्क साधला, परंतु ते पुढे येण्यास टाळाटाळ करत आहेत. आयकर विभागाचा तपास आता बेनामी लॉकरकडे सरकला आहे. जप्त केलेली रक्कम सरकारी खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.
माजी आयपीएस आरएन सिंग म्हणाले, माझा मुलगा लॉकर भाड्याने देतो, बँका देतात, बँकांपेक्षा जास्त सुविधा देतो, यामध्ये आमच्याकडे दोन लॉकर्स खासगी आहेत, आतमध्ये चौकशी सुरू आहे, जवळपास सर्व लॉकर्स तपासले आहेत, आमच्याकडे सर्व तपशील आहेत. घरातील काही दागिने टीमला मिळाले आहेत.
तसेच लॉकर्समध्ये जे काही सापडले आहे त्याची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत.माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर खासगी लॉकर भाड्याने देण्याचे काम केले जात असल्याचे सांगण्यात आले. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याचचे म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App