वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. येत्या २७ मार्चपासून उड्डाणे सुरु होणार आहेत. दोन वर्षांनंतर ही सेवा बहाल केल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.International flights resume from March 27; Undo after two years
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करत आहोत. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने लादलेल्या नियमांचे सर्वांना पालन करणे बंधनकारक असणार आहे. कोरोनामुळे २०२१ पासून एअर बबल प्रणाली अंतर्गत उड्डाणे चालवली जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी केंद्राने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
दोन वर्षांनंतर सेवा पूर्वरत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणाला बंदी घालण्यात आली होती. दोन वर्षानंतर निर्बंध हटवण्यात आले आहे. आतंरराष्ट्रीय विमानसेवा आता २७ मार्चपासून सुरू होणार आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर भारताने जुलैमध्ये एअर बबल प्रणालीच्या माध्यमातून ४५ देशांमध्ये विशेष प्रवासी विमाने चालवण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App