नुपुर शर्मा : देशात दंगे भडकवण्याचा डाव; जुम्मा नमाजानंतर दिल्ली, प्रयागराज सहारनपूर, मुरादाबाद, आदी शहरांमध्ये निदर्शने!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद विरुद्ध काढलेल्या कथित गैर उद्गारांचा मुद्दा उकसून काढून देशात दंगे भडकवण्याचा डाव असल्याचे समोर येत आहे. Instigating riots in the country; Demonstrations in Delhi, Prayagraj Saharanpur, Moradabad, etc. after Jumma Namaz

नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिल्लीतील जामा मशीद, प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबाद आदी शहरांमध्ये मुस्लिमांनी तीव्र निदर्शने करून दगडफेक केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपुर दौऱ्याच्या वेळी 3 जून रोजी अशीच मुस्लिम समाजकंटकांनी दगडफेक करून दंगल घडविण्याचा प्रयत्न केला होता.

कानपुरात 3 जून रोजी झालेल्या दंगलीनंतर आज जुम्माचा पहिला नमाज झाला. यामुळे संपूर्ण राज्यात हाय अलर्ट असतानाच उत्तर प्रदेशच्या 3 शहरांत नमाजानंतर तीव्र निदर्शने करून प्रयागराजमध्ये नमाजानंतर संतप्त जमावाने दगडफेक केली. मुरादाबादेत ‘नुपूर शर्माला फाशी द्या’चे पोस्टर हाती घेत निदर्शने केली. तर सहारनपूरमध्येही जमाव प्रक्षोभक धार्मिक नारेबाजी करत रस्त्यावर उतरला आणि दगडफेक केली.

  • प्रयागराजच्या अटाला मशिदीत नमाजानंतर जमावाने रस्त्यावर उतरुन तीव्र निदर्शने केली. या ठिकाणी जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली.
  • नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास एक कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या भीमसेना प्रमुख
    सतपाल तंवर यांच्याविरोधात कानपूर कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे.
  • सहारनपूरमध्ये जमाव एवढा संतप्त झाला की पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर जमावाने दगडफेक केली. एडीजी कायदा सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सहारनपूरमधील स्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • बिजनौरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय वातावरण बिघडवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
  • गोरखपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर एडीजी झोन अखिल कुमार स्वतः रस्त्यावर उतरले आणि कायदा व सुव्यवस्था राखली
  • लखनऊच्या टीलेवाली मशिद परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. ज्वॉइंट कमिश्नर पोलीस कायदा सुव्यवस्था पीयूष यांच्यासह उच्चपदस्थ पोलिस अधिकारी, 4 केंद्रीयसह पीएसीच्या 6 कंपन्या येथे तैनात आहेत. एडीसीपी पश्चिम चिरंजिवी नाथ सिन्हा यांनी शुक्रवारच्या नमाजामुळे राजधानी लखनऊला 9 झोन 36 सेक्टरमध्ये विभागण्यात आल्याचे सांगितले.
  • कानपूरमधील बेकनगंजच्या 3 किमीच्या कक्षेत पीएसीच्या 9 कंपन्यांचे 800 जवान, आरएएफच्या 3 कंपन्यांचे 375 जवान, शिघ्र कृती दल व पोलिसांचे शेकडो जवान तैनात आहेत. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठीही 100 हून अधिक जणांची टीम तैनात करण्यात आली आहे.

Instigating riots in the country; Demonstrations in Delhi, Prayagraj Saharanpur, Moradabad, etc. after Jumma Namaz

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात