इन्फोसिस देणार ४५ हजार तरुणांना रोजगार, कोरोनामुळे डिजिटीकरणास वेग; मनुष्यबळाची गरज वाढल्याने घेतला निर्णय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या इन्फोसिस यंदा देणार ४५ हजार तरुणांना रोजगार देणार आहे. Infosys to provide employment to 45,000 youth, Corona accelerates digitization; The decision was taken due to the need for manpower

कोविड-१९ साथीमुळे जगभरात डिजिटीकरणास वेग आला. त्यामुळे आयटी कंपन्यांची मनुष्यबळाची गरज वाढली आहे. कंपन्यांकडून एकमेकांच्या कर्मचाऱ्यांची पळवापळवीही वाढली आहे. त्यामुळे इन्फोसिसचे कर्मचारी गळतीचे प्रमाण दुसऱ्या तिमाहीत वाढून २०.१ टक्क्यांवर गेले आहे. आधीच्या तिमाहीत ते १३.९ टक्के होते. कंपनीने अपेक्षित महसूलवृद्धी १४ ते १६ टक्क्यांवरून वाढवून १६.५ ते १७.५ टक्के केली
आहे.



इन्फोसिसचे सीओओ यू. बी. प्रवीण राव यांनी सांगितले की, ८६ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे हायब्रीड कार्यपद्धती स्वीकारण्याची तयारी करीत आहोत. त्यात घरून आणि ऑफिसातून काम करण्याची सोय असेल. कर्मचाऱ्यांना उत्पादकता वाढविणाऱ्या साधनांनी सुसज्ज केले आहे.  सायबर सुरक्षितता आणि कार्यजीवनात समताेल राहावा, असे वातावरण उपलब्ध केले आहे.

सुविधा वाढविण्याची प्रक्रिया सुरूच

प्रवीण राव यांनी सांगितले की, बाजारातील संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, यासाठी आम्ही नवपदवीधरांच्या भरतीच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. आता आम्ही ४५ हजार नवपदवीधरांची भरती करण्याचे निश्चित केले आहे.  कर्मचाऱ्यांच्या सुविधांत सुधारणा करण्याची प्रक्रियाही आम्ही सुरूच ठेवणार आहोत. त्यात आरोग्यसेवा, कल्याण उपक्रम, कौशल्य विकास, सुयोग्य भरपाई हस्तक्षेप आणि वाढीव करिअर वृद्धीच्या संधी यांचा समावेश आहे.

Infosys to provide employment to 45,000 youth, Corona accelerates digitization; The decision was taken due to the need for manpower

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात