Indore Temple Tragedy : इंदूरमध्ये मंदिराचे छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू

MP Tempal

कुटुंबीयांना नुकसानभरपाई जाहीर, दंडाधिकारी चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी

इंदूरमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर बालेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. रामनवमीच्या पूजेदरम्यान मंदिराच्या आतील बाजूची विहीर कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून, यामध्ये आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. Indore Temple Collapse 14 people died in the temple roof collapse accident in Indore

जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांनी १४ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. कलेक्टर म्हणाले की, लष्कराची तुकडी पाचारण करण्यात येत आहे, पायऱ्यांमध्ये पाणी वाढत आहे, त्यामुळे खूप प्रयत्न करावे लागत आहेत.याशिवाय या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बचावकार्य अजूनही सुरू आहे.

पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर –

इंदूर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दुर्घटना कशी घडली? –

इंदूरच्या पटेल नगरमध्ये असलेल्या बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात राम नवमीच्या पूजेदरम्यान मंदिराच्या आतील विहीर कोसळली आणि तेथे उपस्थित २० हून अधिक लोक दबले गेले.

Indore Temple Tragedy  14 people died in the temple roof collapse accident in Indore

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात