‘मी फरार नाही, मी बंडखोर आहे… मी लवकरच समोर येईन’, अमृतपालने जारी केला नवा व्हिडिओ

Amritpal Singh

विशेष प्रतिनिधी

 चंडीगढ : ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक फरार अमृतपाल सिंगने त्याचा दुसरा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये अमृतपाल स्वत:ला फरार नाही तर बंडखोर असल्याचे सांगत आहे. एवढंच नाहीतर आपण लवकरच समोर येणार आहे असंही तो म्हणाला आहे. याशिवाय त्याने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे, सरकारला मी घाबरत नाही, ज्याला जे करायचे ते करू शकता, असे म्हटले आहे. I am  not a fugitive  I am a rebel Iwill come forward soon Amritpal released a new video

अमृतपाल सिंगने धमकीवजा शब्दात म्हटले आहे की, ज्याला माझ्याशी लढायचे असेल ते लढू शकता, मी घाबरत नाही. नवीन व्हिडीओमध्ये अमृतपाल सिंगने आपल्या कुटुंबियांनाही मजबूत राहण्यास सांगितले आहे. आपण ज्या वाटेवरून चालत आहोत तो काट्याने भरलेला असल्याचे त्याने म्हटले आहे. अमृतपालने पुन्हा एकदा अकाल तख्तच्या जथेदारांना सरबत खालसा बोलावण्याचे आवाहन केले आहे.


Indore Temple Tragedy : इंदूरमध्ये मंदिराचे छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू


तो पुढे म्हणाला, ‘’मी जो व्हिडिओ रिलीज करत आहे. कदाचित माझा व्हिडीओ पोलीस कोठडीत बनवल्याचा लोकांना संशय असेल.’’ अमृतपालने पुन्हा एकदा तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. समाजासाठी आणि तरुणांसाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद असल्याचं तो व्हिडिओमध्ये सांगत आहे.

I am  not a fugitive  I am a rebel Iwill come forward soon Amritpal released a new video

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात