पंतप्रधान मोदींची नवीन संसद भवनाला अचानक भेट, बांधकाम कामगारांशी केली चर्चा

PM Modi new

नवीन संसद भवनात एका तासापेक्षा जास्त वेळ घालवला आणि विविध कामांची पाहणी केली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  पंतप्रधान मोदींनी आज (३० मार्च) संध्याकाळी उशीरा अचानक नवीन संसद भवनाला भेट दिली. जवळपास तासाभराहून अधिक वेळ घालवून त्यांनी विविध कामांची पाहणी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहात येणाऱ्या सुविधांचे त्यांनी निरीक्षण केले. Prime Minister Modi surprise visit to New Parliament Building talks with construction workers

पंतप्रधानांनी बांधकाम कामगारांशीही संवाद साधला. पंतप्रधानांसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात नवीन संसद भवनाची पायाभरणी केली होती. कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, कॅबिनेट मंत्री आणि विविध देशांचे राजदूत उपस्थित होते. नवीन संसदेचे क्षेत्रफळ ६४ हजार ५०० चौरस मीटर असेल.

https://youtu.be/U8Sjgqm4Mbs

संसदेच्या जुन्या गोलाकार इमारतीसमोरच नव्या संसदेची त्रिकोणी आकारातील इमारत आहे. नव्या इमारतीमध्ये सेट्रंल हॉलची क्षमता एक हजार लोक बसतील, अशी करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीसाठी हा उत्तम पर्याय असेल. नोव्हेंबर २०२२ मध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता. मात्र काही कारणांमुळे त्याचे काम नियोजित वेळेच्या पुढे गेले.

Prime Minister Modi surprise visit to New Parliament Building talks with construction workers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात