विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमा निश्चितीबाबत अंतिम करार होत नाही तोपर्यंत सीमेवर चकमकीच्या घटना घडतच राहतील, असे मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मांडले.Indo – China tension will not end
नरवणे म्हणाले की, ‘‘ आपला चीनशी सीमेवरून वाद आहे. याआधी चीनने जशा कुरापती केल्या तशाच भविष्यात केल्या तर त्याला सडेतोड उत्तर देऊ. सीमावादावर अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत या चकमकी होतच राहतील.
आपल्यालाही वेगाने हालचाली कराव्या लागतील तसे झाले तरच देशाच्या उत्तर सीमेवर शांतता निर्माण होऊ शकेल.’’ अफगाणिस्तानच्या संभाव्य धोक्याचे आम्ही वेळोवेळी मूल्यमापन करत आहोत. या आधारावर रणनीती देखील आखली जात आहे.
सध्या तालिबानी हे अफगाणिस्तानचे सत्ताधारी बनले असून भारताने त्याबाबत संयुक्त राष्ट्रांत जाहीर चिंता व्यक्त केली होती. या देशाचा भूभाग हा दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येऊ नये असेही बजावले होते.
याबाबत भाष्य करताना नरवणे म्हणाले की, दहशतवादी कारवायांचा विचार केला तर आम्ही सर्व आव्हानांना सामोरे जायला तयार आहोत. जम्मू काश्मीररमध्ये आम्ही अधिक प्रभावीपणे दहशतवादविरोधी मोहीम राबविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App