वृत्तसंस्था
जयपूर : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये गरिबी हटावचा नारा दिला होता, पण काँग्रेसने गरिबी हटविण्याऐवजी देशातला गरीबच हटवून टाकला, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते आज जयपूरमध्ये भाजपचा प्रदेश राजस्थान प्रदेश कार्यकारिणीची कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.Indira Gandhi gave a call garibi hatao, congress irradiated poors, not poverty, allaged amit shah
अमित शहा सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जैसलमेर मध्ये आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या रायझिंग डे निमित्त संचलनाची पाहणी केली आणि बहाद्दूर जवानांना सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी 1971 च्या युद्धात सहभाग घेतलेले सैनिक भैरवसिंग राठोड यांची भेट घेऊन त्यांनाही सन्मानित केले.
राजस्थान दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात अमित शहा यांनी जयपुर मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला संबोधित केले. अमित शहा म्हणाले की, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जरी गरिबी हटाव, अशी घोषणा दिली असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसने गरिबांनाच हटवून टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये केंद्रात सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने गरिबी हटवायला सुरुवात झाली आहे, असे अमित शहा म्हणाले.
राजस्थानचे सध्याचे काँग्रेस सरकार भाजपला अजिबात पाडण्याची गरज नाही. त्यांच्या काळ्या कृत्याने ते स्वतः पडेल 2023 मध्ये दोन तृतीयांश बहुमताने भाजप राजस्थानमध्ये पुन्हा सत्तेवर येईल, असा दावाही अमित शहा यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App