President Of United Nations General Assembly : जम्मू-काश्मीरवर केलेल्या वक्तव्यावरून भारताने शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीचे अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांना लक्ष्य केले. भारताने म्हटले की, ‘भ्रामक आणि पूर्वग्रहदूषित’ वक्तव्यामुळे ते ज्या पदावर आहेत त्याची हानी होते आहे. बोजकीर यांनी जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांसमोर जोरदारपणे आणणे हे पाकिस्तानचे कर्तव्य असल्याचे विधान केले होते. त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासमवेत इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले होते. indias Strong Reply To president of united nations general assembly Bojkir On His Kashmir Statement
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरवर केलेल्या वक्तव्यावरून भारताने शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीचे अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांना लक्ष्य केले. भारताने म्हटले की, ‘भ्रामक आणि पूर्वग्रहदूषित’ वक्तव्यामुळे ते ज्या पदावर आहेत त्याची हानी होते आहे. बोजकीर यांनी जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांसमोर जोरदारपणे आणणे हे पाकिस्तानचे कर्तव्य असल्याचे विधान केले होते. त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासमवेत इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले होते.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या आक्षेप नोंदवत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. मंत्रालयाने म्हटले की, बोजकीर यांचे वक्तव्य स्वीकारार्ह नाही, भारताच्या केंद्रशासित प्रदेशावरून त्यांनी केलेला उल्लेख अनुचित आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या विषयावरील माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, “जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेचे विद्यमान अध्यक्ष दिशाभूल करणारे आणि पूर्वग्रहदूषित भाष्य करतात तेव्हा त्या पदाचे मोठे नुकसान होते.” युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या अध्यक्षांचे वर्तन खरोखरच खेदजनक आहे आणि जागतिक पातळीवरील त्यांचे स्थान नक्कीच क्षीण करत आहे.”
नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात भारतातील जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाविषयी बोजकीर यांनी केलेल्या ‘अयोग्य उल्लेखा’ला तीव्र विरोध दर्शवत बागची म्हणाले की, ” बोजकीर यांचे वक्तव्य पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेणे आणि तो मांडणे म्हणजे ‘कर्तव्य’ आहे, हे स्वीकारले जाणार नाही. इतर जागतिक परिस्थितीशी तुलना करण्यास खरोखरच कोणताही आधार नाही. कुरेशी यांच्या आमंत्रणानंतर तीन दिवसांच्या अधिकृत भेटीवर बुधवारी बोजकीर पाकिस्तानात दाखल झाले होते.
indias Strong Reply To president of united nations general assembly Bojkir On His Kashmir Statement
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App