भारतावरचे परदेशी कर्ज मर्यादेत, अर्थव्यवस्था स्थिर; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा निर्वाळा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विकसित देशात बड्या बँका बुडत असताना आणि त्याचे प्रतिकूल परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला सहन करावे लागत असताना भारतावरील कर्ज मर्यादेत आहे. आपली अर्थव्यवस्था स्थिर आहे, असा निर्वाळा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे.India’s foreign debt limited, economy stable; Resignation of Reserve Bank Governor Shaktikanta Das

देशातील महागाईवरुन विरोधात केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने टीका करत असतात. यातच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील महागाईबाबत मोठा दावा केला आहे. भारताने महागाईचा वाईट काळ मागे सोडला आहे. आपली अर्थव्यवस्था स्थिर आहे, असे ते म्हणाले आहेत. भारताचे परदेशी कर्ज मर्यादेत आहे आणि डॉलरचा भाव वाढल्याने भारतावर कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.



नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गने चालू वर्षात 7% आणि पुढच्या वर्षी 6.5% वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू वर्षातील वाढ जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असेल. डॉलरच्या मूल्यवृद्धीमुळे उच्च परकीय कर्ज असलेल्या देशांना मदत करण्यासाठी RBI गव्हर्नरने G20 द्वारे समन्वित प्रयत्न करण्याचे आवाहन शक्तिकांत दास यांनी केले.

शक्तिकांत दास म्हणाले की, G20 देशांनी हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांना युद्धपातळीवर वित्तपुरवठा केला पाहिजे. कोविड-19 महामारी, युक्रेनमधील युद्ध आणि जगभरातील बँकांनी चलनविषयक धोरण कडक केल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक धक्के बसले. अशा परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे आणि ती सर्वात वेगाने वाढणारी असेल अशी अपेक्षा आहे. अमेरिकेत सध्या बँकिंग क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. यावर बोलताना दास म्हणाले की, अमेरिकेत सुरू असलेले बँकिंग संकट हे स्पष्टपणे दर्शवते की, खाजगी क्रिप्टोकरन्सी आर्थिक व्यवस्थेसाठी कसा धोका निर्माण करू शकते. जास्त ठेवी आणि कर्ज वाढ ही बँकिंग व्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही, असेही ते यावेळी म्हणाले. शक्तिकांत दास यांना 2023 सालासाठी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

India’s foreign debt limited, economy stable; Resignation of Reserve Bank Governor Shaktikanta Das

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात