विशेष प्रतिनिधी
जम्मू : भारतीय लष्करी अधिकाऱ्याने ‘फास्टेस्ट सोलो सायकलिंग – (पुरुष)’ चा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. रणनीतिक स्ट्रायकर्स या विभागाचे लेफ्टनंट म्हणून काम करणारे कर्नल श्रीपाद श्रीराम असे त्यांचे नाव आहे. यांनी शनिवारी पहाटे 4 वाजता लडाखमधील लेह येथून सायकलिंग सुरू केली होती.
Indian army officer’s Guinness World Record! Fastest solo cycling from leh to manali
लेफ्टनंट कर्नल श्रीराम यांनी 26 सप्टेंबर रोजी लेह ते मनाली पर्यंत ‘फास्टेस्ट सोलो सायकलिंग (पुरुष) या कॅटेगरी मध्ये नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. लेह ते मनाली हे अंतर 472 किलोमीटर इतके आहे. आणि एकूण उंची सुमारे 8,000 मीटर इतकी आहे.
विश्वविक्रम…!! सातारा : एका दिवसात ४० किलोमीटर रस्ता ; ३९० कर्मचारी ;लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; राजपथ इन्फ्राकॉनची कामगीरी
कर्नल श्रीराम यांनी कठीण हवामानातही पाच प्रमुख पासेस पार करून 34 तास आणि 54 मिनिटांत हा मार्ग यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आणि ह्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
हा कार्यक्रम ‘स्वर्णिम विजय वर्ष’ सेलिब्रेट करण्यासाठी आयोजित केला होता. त्याचप्रमाणे 195 व्या गनर्स डे साजरा करणे हा देखील हा कार्यक्रम आयोजित करण्या मागे हेतू होता. 1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्धच्या विजयाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरा करतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App