डाळी, खाद्यतेलात भारत होणार आत्मनिर्भर, मोदी सरकारची खास योजना; सन्मान निधीचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : डाळी आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात देशाने आत्मनिर्भर होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. India will be self-sufficient in pulses and edible oil : prime minister Narendra Modi

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता जारी करताना मोदी बोलत होते.

ते म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळातही भारत पहिल्यांदाच कृषि निर्यातीत पहिल्या दहा देशांच्या यादीमध्ये पोचला आहे. भारताची ओळख एक कृषि निर्यातक देश म्हणून निर्माण होत आहे. यावेळी पंतप्रधानांनी खाद्यतेलात आत्मनिर्भरता आणण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑइल पाम मिशनची घोषणा केली. यामध्ये 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

डाळी आणि खाद्यतेलाबाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याबाबत पंतप्रधानांनी भाष्य केलं. शेतकरी आणि सरकार यांच्या समन्वयामुळे देशातील अन्न भांडार भरलेले असल्याचे ते म्हणाले. गहू, तांदुळ आणि साखरच नव्हे तर डाळी आणि खाद्यतेलाच्या बाबतीतही आत्मनिर्भरता आवश्यक असून देशातील शेतकरी हे करू शकतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

डाळीच्या उत्पादनात ५० टक्के वाढ

पंतप्रधानांनी डाळींच्या बाबतीत बदललेली परिस्थिती सांगितली. सुरुवातीला डाळ आयात करावी लागत असे, मात्र स्थिती बदलली आहे. त्यांनी असे म्हटले की, ‘गेल्या सहा वर्षात डाळीच्या उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. जे काम आपण डाळींसंदर्भात करुन दाखवले आहे तोच संकल्प आता खाद्यतेलांच्या उत्पादनाबाबतीत करायचा आहे. याकरता वेगाने काम करावं लागेल जेणेकरुन याबाबतही देश आत्मनिर्भर बनेल.

देश कृषि निर्यातक बनत आहे

पंतप्रधान असं म्हणाले की, ‘आज जेव्हा भारताची ओळख कृषि निर्यातक देश म्हणून होत आहे. तेव्हा आपण खाद्यतेलाशी संबंधित गरजांसाठी आयातीवर निर्भर राहणं योग्य नाही. राष्ट्रीय खाद्य तेल मिशनच्या माध्यमातून खाद्यतेलासाठी 11 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाईल. शिवाय सरकारकडून हे सुनिश्चित केलं जाईल की शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यासह प्रौद्योगिक आणि अन्य सुविधा मिळतील.

India will be self-sufficient in pulses and edible oil : prime minister Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात