प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतून उठाव करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेचे 12 खासदारही शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला आहे. आपल्याला समर्थन देणाऱ्यांना आपण निवडणूकीत पडू देणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी थेट विधानसभेत सांगितले. त्यांचे हे विधान इंडिया टीव्हीने केलेल्या एका सर्व्हेतून खरे होताना दिसत आहे. India TV Survey: If the Lok Sabha elections are held, Sarshi belongs to the BJP-Shinde group
जर देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज “मूड ऑफ नेशन” या इंडिया टिव्हीने केलेल्या सर्व्हेत मांडण्यात आला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक लोकसभा जागा मिळणार असून शिंदे गटाला ठाकरे गटाच्या शिवसेनेपेक्षाही जास्त जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त झाला आहे.
काय सांगतो सर्व्हे?
जर आता लोकसभा निवडणुका लागल्या तर राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजपला 26, शिंदे गटाला 11, ठाकरे गटाच्या शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असे या सर्व्हेतून समजत आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदेंना गद्दार म्हणत असली तरी राज्यातील जनतेने शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचे या सर्व्हेतून दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App