कोरोना बळीत भारताचा तिसरा क्रमांक; पाच लाख नागरिकांचाआतापर्यंत मृत्यू


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना बळींच्या संख्येत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात तब्बल ५ लाख बळी कोरोनामुळे गेले आहेत.जागतिक क्रमवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून सर्वाधिक ९.१ लाख बळी गेले आहेत.India third in corona victim;Five lakh civilians have died so far

दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. तेथे सुमारे ६.३ लाख जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. रशियात ३.३ लाख लोकांचा मृत्यू झाला असून तो जागतिक क्रमवारीत चौथ्या नंबरवर आहे. त्यानंतर मेक्सिकोचा नंबर लागत असून तेथे३.०७ लाख जण बळी गेले आहेत.भारतात १ जुलै २०२० रोजी बळीच्या संख्येने ४ लाखांचा टप्पा ओलांडला होता. केवळ २१७ दिवसांत ही संख्या पाच लाखांवर पोचली आहे. परंतु एक लाख लोकांचा बळी जाण्यास बराच वेळ लागल्याचे आकडेवारी सांगत आहे. याचाच अर्थ मृत्यूचा वेग हा कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरण वेगाने झाल्याने मृत्यूचा दर कमी झाल्याचे या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

India third in corona victim;Five lakh civilians have died so far

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी