विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: जर्मनीची संस्था वेल्ट हंगर शिल्पे आणि आयर्लंडची एजन्सी कंसर्न वर्ल्डवाईड यांनी जागतिक भूक निर्देशांकातील देशांचे स्थान जाहीर केले आहे. एका वर्षांत ९४ व्या क्रमांकावरून भारत ११६ देशांपैकी १०१ व्या स्थानावर आला आहे.
India rank 101th position in Global Hunger index, India slipped to 7 places and is behind Nepal, Pakistan and Bangladesh
२०२० मध्ये भारताचे स्थान ९४ व्या क्रमांकावर होते. यावर्षी भारत बांगलादेश (७६), पाकिस्तान (९२), नेपाळ (७६) आणि म्यानमार (७१) यांच्याही मागे गेला आहे. जर्मनी आणि आयर्लंड यांनी केलेल्या या संयुक्त अहवालामध्ये भारताचे हे स्थान चिंताजनक असल्याचा उल्लेख आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांची परिस्थिती चिंताजनक असली तरी भारताच्या तुलनेने हे देश अन्न पुरवण्यामधे चांगली कामगिरी करत असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.
फेसबुकवरील कंटेटमुळे समाजाचे ध्रुवीकरण सहज शक्य – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
या अहवालानुसार कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे नागरीकांवर याचा वाईट परिणाम झाला. त्यामुळे उपासमारीची परिस्थिती जास्त चिंताजनक बनली. भारतामध्ये चाइल्ड वेस्टींगचे प्रमाण हे १९९८ ते २००२ या दरम्यान १७.१ टक्के होते. हे प्रमाण २०१६ ते २०२० च्या दरम्यान १७.३ टक्के इतके वाढले आहे. बालमृत्यूचे प्रमाण, बालमृत्यूचे दर, मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण यामध्ये मात्र भारताने सुधारणा केली असल्याचे या अहवालात सांगितले आहे.
२००० साली भारताचा जागतिक भूक निर्देशांक ३८.८ वरून २०१९ मध्ये २७.५ वर आला. कुपोषण, मुलांच्या वाढीचा दर, बालमृत्यू संबंधीत आकडे आणि अल्पपोषण या चार बाबींचे निरीक्षण करून या निर्देशांकाची गणना केली जाते. या अहवालामध्ये एकूण ११६ देश आहेत. ब्राझील, कुवैत आणि चीनसह १८ देशांनी पाच पेक्षा कमी क्रमांक मिळवून या यादीत अव्वल स्थान मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App